गुलाबराव पाटलांकडून नगरसेवकांचा घोडेबाजार', गिरीश महाजन भडकले, शिवसेनेचंही प्रत्युत्तर

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) नगरसेवक फोडाफोडीच्या प्रकरणावरुन महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांचे दिग्गज नेते आमनेसामने आले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवेसनेचे नेते आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राजकीय खेळी करत भाजपच्या नगरसेवकांना शिवसेनेत सहभागी करत महापालिकेत सत्ता काबीज केली होती. त्यानंतर शिवसेनेत (Shiv Sena) आलेले काही नगरसेवक भाजपात (BJP) पुन्हा गेले होते. पण ते पुन्हा शिवसेनेत आले. या सर्व घडामोडी भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागल्या आहेत. त्यातूनच खान्देशातील भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी थेट गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटलांकडून नगरसेवकांचा घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप महाजनांनी केला आहे. तर पाटलांनी महाजनांना सडेतोड उत्तर दिलं आहे. नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणावरुन दोन्ही पक्षाचे दिग्गज नेत्यांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत.महापालिकेत सध्या जो घोडेबाजार सुरुय, पाच लाख रुपये, दोन लाख रुपयांत नगरसेवक विकले जाताहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून सर्वच पक्षांसाठी घातक आहे. पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांना अपात्रेची कारवाई करण्याबाबतही महाविकास आघाडी सरकार जाणून बुजून दुलर्क्ष करत आहे. सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत आहे", असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

(काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फोनवर बातचित, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?)

"पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून महापालिकेत नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरु आहे. त्यांनी विकासावर लक्ष द्यावे", अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री ‌गिरीश महाजन यांनी केली. "पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव महापालिकेत ज्या पद्धतीने निधी आणत आहेत त्या पद्धतीने त्यांनी मंत्री असल्याने जळगाव जिल्ह्याच्या विकासावरही लक्ष द्यावे", असंही गिरिश महाजन म्हणाले.

महाजनांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचे उत्तर

गिरीश महाजनांच्या टीकेला शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "गिरीश महाजन यांनी मागच्या काळात जे केले तेच मी करतो आहे. ते माझे मोठे भाऊ आहेत", अशी मिश्किल टीप्पणी त्यांनी केली. "महापालिकेत भाजपच्या निवडून आलेल्या 57 नगरसेवकांमध्ये अर्धे शिवसेनेतच होते. गिरीश महाजनांनी फोडू नये. मी पण कुणाचे फोडणार नाही", अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांना टोला लगावला. राज्यात सत्ता असताना भाजपचे गिरीश महाजन यांनी जे केलं तेच मी करत असल्याचा निशाणाही गुलाबराव पाटील यांनी लगावला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default