पाच राज्यांच्या निकालापूर्वीच विधानसभाध्यक्षाची निवडणूक आटोपण्याचा आग्रह; मुख्यमंत्री राज्यपालांना पत्र पाठवणार?

फुले शाहू आंबेडकर
0
: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट होईल, अशी भाकीतं भाजपच्या नेत्यांकडून वर्तविली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारही सावध झाले आहे. त्यामुळे आता सरकारकडून विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक तातडीने व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभाध्यक्षाच्या निवडीसाठी सरकारने प्रयत्न केले होते. मात्र, भाजपने राज्यपालांकडे धाव घेत हा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यामुळे आता ठाकरे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची तयारी सुरु केली आहे. ११ मार्चपूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवड व्हावी, असा सरकारचा आग्रह आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली नव्हती. त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवल्यास राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. (Vidhan Sabha speaker Election in Maharashtra)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default