यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय ७०) आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस (३५, दोघेही रा. पंडित कॉलनी) यांचा डिसेंबरमध्ये खून झाल्याचे तपासातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे याबाबत कोणतीही तक्रार शहर अथवा ग्रामीण पोलिसांत दाखल नव्हती. कापडणीस यांच्याकडे बरीच मालमत्ता आहे. याची माहिती संशयित राहुल जगताप याला मिळाली. राहुल त्यांच्याच इमारतीमध्ये राहायचा. ही मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने त्याने या दोघांचा खून करण्याची योजना आखली. त्याने नानासाहेब यांना काही कारणास्तव घराबाहेर नेले. त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना गिरणारेपर्यंत नेले. तिथे त्यांचा गळा दाबून खून करून पुढे अंबोली घाटात मृतदेह ढकलून जाळला. याच पद्धतीने त्याने त्यांचा मुलगा अमित यालाही आठ दिवसांनंतर खून करून राजूर येथे मृतदेह जाळलाकापडणीस यांची मुलगी शीतल आणि पत्नी मुंबईत राहतात. बऱ्याच वर्षांपासून ते एकत्र राहत नव्हते. मात्र, फोनवरून संभाषण व्हायचे. मात्र, डिसेंबरपासून संवाद होत नव्हता. एकदा शीतल यांनी फोन केला, तर त्या वेळी संशयित राहुलने फोन उचलून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे १६ जानेवारी २०२२ रोजी शीतल कापडणीस नाशिकमध्ये आल्या. त्यांनी पंडित कॉलनीतल्या घरात पाहणी केली; मात्र त्यांना वडील-भाऊ आढळले नाहीत. त्यामुळे त्या मुंबईत परतल्या. मात्र, २८ जानेवारी रोजी त्या पुन्हा नाशिकमध्ये आल्या. वडील व भाऊ नसल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्याचा तपास करीत असताना कापडणीसांच्या शेअर ट्रेडिंगमधून अचानक मोठे व्यवहार झाल्याचा संशय आला. त्यानुसार ट्रेडिंग मॅनेजर प्रदीप शिरसाठ याची चौकशी करण्यात आली. त्याने संशयित राहुल जगतापच्या सांगण्यावरून पैसे वळते केल्याचे सांगितले. जगतापला ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला.
अमित कापडणीसचे एमबीबीएसपर्यंत शिक्षण झाले असून, २००९ पासून त्याने कोणताही वैद्यकीय सराव केलेला नाही. केवळ घरात राहणाऱ्या अमितशी गट्टी करून, रोजच्या पार्टीतून जगतापने सर्व मालमत्तेसह इतर माहिती संकलित केली. त्यानंतर वडिलांसह मुलाच्या खुनाचा 'प्लॅन' आखला. १८ डिसेंबर २०२१ पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलिस ठाण्यात, तर २८ डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलिस ठाण्यात अज्ञात मृतदेह आढळल्याची नोंद आहे. त्यानुसार मोखाडा हद्दीत नानासाहेब, तर राजूरमध्ये अमितचा मृतदेह जाळल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली. संशयित जगताप २०१२ पर्यंत परदेशात नोकरी करायचा. काही कारणास्तव नोकरी सोडून भारतात परतल्यावर त्याने व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्याचे शहरात दोन कापड दुकाने असून, एक हॉटेल आहे. यासह जमीन खरेदी-विक्री आणि शेअर ट्रेडिंगमध्येही तो काम करायचा.नानासाहेबांचा मोबाइल वापरायचाचेक वापरून पैसे काढले
बंगल्याच्या ठेकेदाराला पैसे दिले
बांधकामाला नोटीस आल्यावर पत्रे लावून घेतले
आलिशान गाडी खरेदी केली
नानावलीतल्या गाळ्याची १२ लाख बिल्डरला अदा केली
सोसायटीच्या फ्लॅटमधून साहित्य काढून देवळातील रो-हाउसमध्ये नेले
९७ लाखांचे शेअर ट्रेडिंग
२० लाखांची मुदत ठेव मोडण्याचा प्रयत्न
३० लाखांची मुदत ठेवीचे कागदपत्र स्वत:कडे घेतले
कापडणीसांची प्रॉपर्टी
पंडित कॉलनीत चार फ्लॅट
