संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

फुले शाहू आंबेडकर
0

राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील संजय राऊत यांनी यावेळी काही गंभार आरोप केले. ही पत्रकार परिषद संपल्यावर यावर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेनेचा मित्र पत्र असणाऱ्या काँग्रेसकडून प्रतिक्रिया आल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी मलिक यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षच काय २५ वर्षे चालणार असल्याचंही बोलून दाखवलं.

नवाब मलिक म्हणाले की, “आज ज्या प्रकारे संजय राऊत यांनी मागील सरकारमध्ये आयटी विभागात काय घोटाळे झालेले आहेत, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे. याचबरोबर किरीट सोमय्या यांच्या भ्रष्ट्रचार प्रकरणांचा उल्लेखही केलेला आहे आणि बरेच काही विषय त्यांनी समोर आणले आहेत. मला वाटतं निश्चितपणे हे विषय ते आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवणार आहेत. या संदर्भात अधिक चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी स्वत: माहिती दिलेली आहे. मला वाटतं ज्या पद्धतीने हरियाणा कनेक्शन सगळं त्यांनी काढलेलं आहे. म्हणजे आम्ही अगोदरपासूनच बोलत होतो की, सर्वात जास्त घोटाळा कुठे झाला असेल तर इनकम टॅक्स विभागात आहे. आता त्यांनी सुरुवात केलेली आहे मला वाटतं आणखी पुढे पुढे ते सगळे विषय, कागदपत्र ते लोकासमोर ठेवतील 

तसेच, “तक्रारींची दखल जर ईडी घेत नसेल मग आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील तक्रार होऊ शकते. आता पुढे कसं काय होणार आहे, कागदपत्र त्यांनी अजून कोणासमोर ठेवलेले नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही सुरूवात करतोय, हळूहळू सर्व विषय समोर आणू मला वाटतं की पुढील पत्रकार परिषदेत ते कागदपत्रं लोकासमोर ठेवतील. ” असं नवाब मलिक यांनी सांगितलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default