अमरावती पोलिसांची मोठी कारवाई! धाडीत 10 किलो सोने सापडले, रोख रक्कमही जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
राजापेठ पोलिसांनी (Rajapeth Police) दिलेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील दसरा मैदान परिसरातील राधाकृष्ण अपार्टमेंट (Dussehra Maidan Radhakrishna Apartment) आहे. या अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 401 मध्य काही व्यक्ती संशयास्पद असल्याची गुप्त माहिती मध्यरात्रीच पोलिसांना मिळाली. त्याआधारे राजापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे (Police Inspector Manish Thackeray) व त्यांचे पथक व्हिडीओ कॅमेरा घेऊन या अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. यावेळी त्या फ्लॅटमध्ये राजेंद्र सिंगसह अन्य दोन व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यक्तींकडे बरेच व्यवहाराचे कागदपत्र देखील होते. असंही पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितलं. हे आरोपी सोने व्यापाऱ्यांच्या संपर्कात अशी माहिती समोर आली आहे.

सोन्याची किंमती सुमारे पाच कोटी

या कारवाई दरम्यान दहा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने सापडले. याची सोन्याची किंमत पाच कोटी इतकी आहे. शिवाय पाच लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलिसांनी आयटी विभागालाही दिली आहे, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील मूळच्या राजस्थानातील राजेंद्र सिंग या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला न्यायालयातदेखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितलं.

व्यवसाय चार वर्षांपासून

धाड पडली त्याठिकाणी राजेंद्र सिंग राव व्यवसाय करतो. गिरीराज जगदीश सोनी व अशोक सत्यनारायण खंडेलवाल हे त्याचे साथीदारही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तो चार वर्षांपासून हे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कच्च्या चिठ्ठ्या-पट्ट्यांवरून काहीतरी गडबड दिसते. विशेष म्हणजे रात्री अडीच वाजता राजपेठ पोलिसांनी ही धाड टाकली. टीममध्ये पीआय अहीरकर, पीएसआय मापारी, महिला व इतर कर्मचारी असा सारा ताफा घेऊनही पोलीस पोहचले होते. त्यामुळं आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही. आयटी डिपार्टमेंटला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पुढील तपास ते करतील. त्यानंतर हे सोने कुठून आले आणि कुठे घेऊन जात होते. याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default