विद्यापीठाच्या संगणक विभागात आग

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक विभागाला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत काही संगणक, वातानुकूलित यंत्रणा, पंखे व अनेक खुर्च्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या कोकणवाडीतील अग्निशमन विभागाचा एक बंब तातडीने रवाना झाला. बंबसोबत वाहनचालक मनोज राठोड, ड्यूटी इन्चार्ज लक्ष्मण कोल्हे, फायरमन सुजीत कल्याणकर, इरफान पठाण, विक्रम भुईगळ आदी अधिकारी रवाना झाले. आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार ६० हजारांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default