शिरपूर पंचायत समिती गट विकास अधिकारी सेवानिवृत्तीच्या 3 तास आधीच लाचलुचपतया विगाच्या जाळ्यात

फुले शाहू आंबेडकर
0

शिरपूर/ प्रतिनिधी:-समितीचे गटविकास अधिकारी यांच्या आज कार्य काळाच्या शेवटचा दिवस होता व त्यांची सेवानिवृत्ती होणार होती त्याआधीच 3 तास पूर्वी एसीबीने टाकलेल्या धाडीत पाच हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात त्यांना रंगेहात पकडण्यात आले व चौकशीअंती शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासोबत सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती यांच्या हस्ते लाच स्वीकारली म्हणून त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे

आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास सदरची घटना समोर आली असून सदर घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरले व खळबळ माजली होती.
यात जाहीर करण्यात आलेल्या प्रेस वार्ता नुसार शिरपूर तालुक्यातील तक्रारदार हे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या घराच्या दुरुस्ती कामे भविष्य निर्वाह निधीत जमा रकमेतून ना परतावा 5 लाख रुपये अग्रीम मिळण्याकरिता त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्या नावे अर्ज केला होता व सदरची अग्रीम रक्कम मंजूर होण्याकरता गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयाला लाचेची मागणी केली होती अशी तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक 30 मार्च रोजी केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पंच व साक्षीदार यांची पडताळणी केली असता ही मागणी केली असल्याचे निदर्शनास आले म्हणून दिनांक 31 मार्च 2022 रोजी पंचायत समिती शिरपूर येथे सापळा लावला असता गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी सहाय्यक लेखा अधिकारी चुनीलाल गोपीचंद देवरे यांच्या हस्ते पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. चौकशीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री अनिल बडगुजर ,पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजीत चव्हाण ,राजन कदम, कृष्णकांत वाडीले ,भूषण खलानेकर, प्रशांत चौधरी, भूषण शेटे, कैलास जोहरे, शरद काटके, महेश मोरे, संतोष पावरा ,संदीप कदम, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.

या कारवाईसाठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री नारायण न्हाखळदे व वाचक पोलीस उपाध्यक्ष श्री सतीश भामरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

यासोबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी सामान्य जनतेस आव्हान केले आहे की ज्यांच्याकडे शासकीय कामाकरता शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default