विजेच्या तुटलेल्या तारेचा झटका लागून शेतकऱ्याचा मृत्यू; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

फुले शाहू आंबेडकर
0

शेतात गहू कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला महावितरणच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. शिवाजी नाथा माने (वय ६०, हेरवाड ता. शिरोळ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेने म्हटले आहे. शिवाजी माने हे पहाटे आपल्या शेतात गहू कापण्यासाठी गेले होते. याचवेळी महावितरण विभागाच्या खांबावरील तुटून पडलेल्या तारेवर या शेतकऱ्याचा पाय पडला.त्याचा जबरदस्त धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा शेतीला दिवसा दहा तास वीज द्यावी ,अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default