अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; कबड्डी कोचला जन्मठेप

फुले शाहू आंबेडकर
0
खेळाडू मुलींची राज्यस्तरावर निवड करण्याचे आमिष दाखवून कबड्डी कोचने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अकोल्यातं समोर आली होती. आता या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत आरोपीने अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केलं होतं. शुद्धोधन सहदेव अंभोरे असं या जन्मठेप झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी शुद्धोधन अंभोरे हा शिवणी येथे प्रशिक महिला कबड्डी संघाचा प्रशिक्षक असून, त्याच्याकडे १५ ते २० मुलींची बॅच होती. या दरम्यान, बॅचमधील एका १७ वर्षीय मुलीचा तो विशेष सराव घेऊ लागला. अन् त्यातूनच मुलीला राज्यस्तरावर चमकवणार असल्याचं सांगू लागला. सरावा दरम्यान त्यानं वर्षभरापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कुणाला काही न सांगण्याची त्याने धमकी दिली व सातत्याने सरावादरम्यान अत्याचार करीत होता. आरोपी कोचच्या भीतीने मुलीने याची वाच्यता केली नाही. त्यानंतर मुलीला गर्भधारणा झाली.सदर, या प्रकरणाची ३० जुलै २०१८ रोजी पीडीत मुलीच्या तक्रारीनंतर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुद्धोधन सहदेव अंभोरेविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यानंतर न्यायालयात या संदर्भात खटला सुरु झाला. पीडीतं मुलीच्या जबाब, साक्ष आणि आणखी एका पिडीतीने तिच्यावर सुद्धा याच आरोपीने विनयभंग केल्याबाबत दिलेली साक्षसह इतर पुरावे, डीएनए'च्या आधारे असलेले आरोप सिद्ध झाले. अशाप्रकारे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default