आझाद मैदानात होणार निदर्शने
महाराष्ट्र राज्यात सर्व शहरातून बँक कर्मचारी निदर्शने, मोर्चे, धरणे इत्यादी कार्यक्रम संघटित करून सरकारच्या जनविरोधी कामगार विरोधी धोरणांना असलेला आपला विरोध व्यक्त करत आहेत. मुंबई मधील बँक कर्मचारी २८ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता फोर्ट
विभागातील आपापल्या शाखां समोर एकत्र जमून मोर्चाने आझाद मैदानात जमा होतील जेथे संपकरी बँक कर्मचाऱ्यांचा मेळावा सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तेथे विविध बँकातील कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांचे नेते मेळाव्याला मार्गदर्शन करतील. याशिवाय २९ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता संपकरी कर्मचारी होर्निमन सर्कल, मुंबई येथे एकत्रित जमा होऊन, मानवी साखळी कार्यक्रमात
सहभागी होतील.

संपकरी करणार जनजागृती
संपकरी बँक कर्मचारी राज्यभरातून या दोन दिवसात बँक ग्राहक तसेच जनता यांच्यापर्यंत पोहोचून बँक खाजगीकरणाला त्याचा असलेला विरोध याबाबतची आपली भूमिका त्यांना समजावून सांगतील. व्यापक प्रमाणात पत्रके वाटतील व बँक खाजगीकरणाच्या विरोधात आपली लढाई पुढे नेतील . जर सरकारने या लोकसभा अधिवेशनात बँकिंग दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर बँक कर्मचारी आणि अधिकारी आपले आंदोलन अधिक तीव्र करतील व आवश्यकतेनुसार वेळ पडली तर बेमुदत संपासह सर्व कार्यक्रम हाती घेतील आणि आपले आंदोलन अधीक तीव्र करतील.