एके दिवशी रमेशचा फोन लागत नसल्याने संबंधित मुलीने मंगळवेढा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी रमेश भोसले या नावाचा त्या ठिकाणी कोणीही अधिकारी कार्यरत नसल्याची माहिती त्यांना मिळाली.
यानंतर त्या मुलीने पंढरपूर निर्भया पथकाचे संपर्क साधला. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाने निर्भया पथक प्रमुख प्रशांत भागवत, सहा.पेालीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, पोलीस कर्मचारी प्रसाद औटी, निलेश कांबळे, अरबाज खाटीक, निता डोकडे, कुसुम क्षिरसागर, अविनाश रोडगे यांनी सापळा रचून रमेश भोसले याला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करायचा
आपण खरोखरच पोलीस उपनिरीक्षक आहोत, हे भासविण्याठी पोलीस उपनिरीक्षक या पदाचा खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल इ. साहित्य सोलापूर येथून आणून पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व बनावट आधारकार्ड देखील तयार करुन घेवून त्याचा उपयोग रमेश भोसले याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणुक करण्यासाठी केला होता. तसेच तो स्वतःचे वडील आयपीएस अधिकारी म्हणून स्वतः फोन वरून मुलीच्या फोनवर फोन करत असल्याची माहिती निर्भया पथक प्रशांत भागवत यांनी सांगितली.
फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहाआपली पंचतारांकित हॉटेल्स आहेत. अनेक मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयजी यांच्याशी खास ओळख आहेत. त्याचबरोबर पंचतारांकित हॉटेल जमिनी आहेत. अशी खोटी माहिती मुलीच्या आईला सांगून तुमच्या मुलीशी लग्न करून द्या म्हणून रमेशने तगादा लावला होता. परंतु त्याचे भिंग उघडे पडले. शहरातील मुलींनी अशा फसविणाऱ्या तरुणांपासून सावध रहा गरज पडल्यास निर्भया पथकाशी संपर्क साधा असे आवाहन पो कर्मचारी कुसुम क्षीरसागर यांनी केले आहे.
