धुळे ब्रेकिंग..गजबजलेल्या बाजारपेठेत भीषण आग
बुधवार, मार्च २३, २०२२
0
धुळे : शहरातील पाच कंदील परिसरातील गजबजलेल्या बाजारात दुकानांना अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले आहे. बाजारात जवळजवळ दुकाने असल्याने आग वाढण्याची भीती व्यक्ती केली जात असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेतधुळे (Dhule) शहरातील पाच कंदील हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात असलेल्या दुकानांना अचानक आग लागली. आगीच्या भक्ष्यस्थानी बहुतांश दुकाने असून, आग (Fire) विझविण्यात देखील अडचणी येत आहेत. आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे आणखी दुकानांना आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी देखील याच परिसरामध्ये अशाच पद्धतीने आग लागली होती.अग्नीशमन बंब दाखल
आग लागलेल्या दुकानांचा परिसर गजबजलेला आहे. दुकानांना लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.
Tags

