“जात…जात नाही तोवर…”, केदार शिंदे यांनी ‘झुंड’ चित्रपटावरुन केलेले ट्वीट चर्चेत
रविवार, मार्च ०६, २०२२
0
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक केलं आहे. यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.केदार शिंदे यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत केदार शिंदे म्हणाले, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.” केदार शिंदे यांनी केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Tags
