मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून शेतकºयाची १५ लाखांची फसवणूकतोतया पत्रकारांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
सोलापूर - मुलाला मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तोतया पत्रकारांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय टाटिया, भूषण राजेंद्रकुमार टाटिया, किरण सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तोतयागिरीमुळे विजय टाटिया याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 
      सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, निलप्पा नारायणे (वय ५५) हे शेतकरी करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात. नारायणे यांची स्वप्नील बाहेती याच्यामुळे विजय टाटिया, भूषण टाटिया, किरण सावंत यांच्याशी ओळख झाली. विजय टाटिया हा मोठा पत्रकार असून, त्याची पोलीस अधिकारी व राजकारण्यांसोबत ओळख आहे, असे पटवून दिले. या ओळखीतून मुलाला मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी निलप्पा नारायणे यांना दावत हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतले. नोकरीला लागण्यासाठी १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे विजय टाटिया याने सुशील बाफणा यांच्या समोर निलप्पा यांना सांगितले. सदर रक्कम किरण सावंत याच्याकडे द्यावी लागेल, असेही विजय टाटिया याने सांगितले. मुलाला मंत्रालयात नोकरीला लागण्यासाठी निलप्पा यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार निलप्पा नारायणे यांनी १६ फेब्रुवारी २०१६ रोजी दक्ष पोलीस टाईम्स पेपरच्या बँक खात्यात ३ लाख रुपये, १० मार्च २०१६ रोजी १ लाख, ३० मार्च २०१६ रोजी १ लाख, १० मे २०१६ रोजी २ लाख, ७ जून २०१६ रोजी २ लाख, १० मे २०१६ रोजी ३ लाख, ८ जून २०१६ रोजी ३ लाख रुपये असे एकूण १५ लाख रुपये वेळोवेळी जाम केले. 
       दरम्यान, अनेक दिवस उलटे तरी मंत्रालयात नोकरी लागली म्हणून निलप्पा नारायणे यांनी विजय टाटिया याला जाब विचारला. त्यावेळी विजय टाटिया याने उडावा उडवीची उत्तर दिली. मला पैसे दिले नाहीत, किरण सावंत याला पैसे दिले आहेत. त्याच्याकडूनच पैसे घ्या, असे सांगितले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निलप्पा नारायणे यांनी विजयापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार केली. सदर तक्रारीची दखल घेऊ न २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विजय टाटिया, भूषण टाटिया, किरण सावंत यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
      समाजासाठी घातक असलेल्या विजय टाटिया व त्याच्या साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र काही निवडक गद्दार पोलीस विजय टाटिया याचे पाठबळ वाढवत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी विजय टाटियावर अनेकदा कारवाई टाळली आहे. सोलापूर जिल्हा पोलीस दलात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता विजय टाटिया याच्या गुन्ह्याचा घडा भरला असून त्याच्यावर लवकरच मोक्का अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे. भविष्यात आणखी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी व फसवणूक झालेल्यांना न्याय देण्यासाठी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

  काही निवडक गद्दार पोलिसांचे विजय टाटियाला पाठबळ

विजय टाटिया हा मूळचा धुळे जिल्ह्यातील खलाने गावचा रहिवासी आहे. विजय टाटिया याची कोमलसिंग दौतलतसिंग परमार याच्यासह इतर साथिदारांची टोळी असून ते सवर्सामन्यांना आपल्या जाळ्यात अडकवून गुन्हेगारी कृत्य करत आहेत. अशा प्रकारे त्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. सन १९९६ सालापासून धुळे, शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबार, थाळनेर, दोंडाई आदी ठिकाणांसह उत्तर महाराष्ट्रात कूकर्म केल्याने त्यांच्याविरुद्ध ६० ते ७० गुन्हे दाखल आहेत. तसेच राज्यभर अन्य ठिकाणी ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी धुळे पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२८, ३६३, ३६५, ३६६ ए, ३७० अ, ३७२, ३७३, ३७६, १२० ब, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर विजय टाटिया याने त्या पीडित मुलीला वेश्याव्यवसायत ढकलल्याचे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default