तब्बल १३ महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या
तब्बल १३ महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने पदोन्नतीबाबब वृत्त प्रकाशित करताच पोलीस महासंचालक कार्यालयात वेगाने हालचाली झाल्या. अखेर पीएसआय अधिकाऱ्यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली.
राज्य पोलीस दलातील ११० आणि १११ तुकडीतील तब्बल ८५० पोलीस उपनिरीक्षक गेल्या १३ महिन्यांपूर्वीच पदोन्नतीच्या कक्षेत होते. परंतु, करोना आणि शासकीय कारणास्तव पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. शेवटी पोलीस महासंचालक कार्यालयातून गेल्या ११ फेब्रुवारीला राज्यातील ८५० पोलीस उपनिरीक्षकांना महसुली संवर्ग मागण्यात आला. मात्र जवळपास एक महिना झाल्यानंतरही पदोन्नतीबाबत हालचाली होत नव्हत्या. ‘लोकसत्ता’ने रखडलेल्या पदोन्नत्याबाबत वृत्त प्रकाशित करून पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महासंचालक वृत्ताची गांभीर्याने दखल घेतल्याने पीएसआय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत वेगाने हालचाली झाल्या. संवर्ग मागितलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची समस्यांचे समाधान झाल्यानंतर मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पदोन्नत्याची यादी जाहिर करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झा
मानले आभार
गेल्या १३ महिन्यांपासून पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या पीएसआय अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र, ‘लोकसत्ता’ने त्यांच्या पदोन्नतीचा विषय लावून धरत वृत्त प्रकाशित केले. पदोन्नतीची यादी जाहिर होताच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी समाजमाध्यामातून संदेश पाठवून आणि कार्यालयात दुरध्वनी करून आभार मानले.
राज्यभरातील अधिकाऱ्यांमध्ये आनंद
पदोन्नतीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पदोन्नती होताच आनंदाची लाट पसरली. अनेकांनी एकमेकांनी शुभेच्छा देऊन बदली झालेल्या ठिकाणी जाण्याची तयारी सुरू केली. अनेकांनी एकमेकांची भेट घेऊन बदली झालेल्या शहरातील रिक्त जागांचा आढावा घेतला
