धक्कादायक! एसटी बसस्टँडमध्ये तरुणाची आत्महत्या, आय लव्ह यू लिहित म्हटले...

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : जिल्ह्यातल्या धडगाव येथील बसस्टँडच्या शेडमध्येच आज एका युवकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. एका युवकाने रात्री प्रवासी शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आत्महत्येपूर्वी या युवकाने जमिनीवर एका मुलीच्या नावे निरोप देखील लिहला आहे. त्यामुळे त्याने प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवल्या जात आहे.धडगाव बाजारपेठेतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकात रात्रीच्या वेळी अनोळखी युवकाने शेडमधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत धडगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. अद्याप या तरुणाची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र बसस्थानकातील फरशीवर त्याने आत्महत्येपूर्वी खडूने नोट लिहिली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिले...

मी एका मुलीशी प्रेम करतो आणि प्रेम प्रकरणात धोका मिळाला आहे. दोन दिवस मी उपाशी राहिलो. फक्त पाणी प्यायलो, असे त्याने लिहिलेले आढळून आले आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी तरूणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ओळख पटल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. याबाबत धडगाव पोलिस अधिक तपास करत आहे. संबंधित तरुणाबद्दल अधिक माहिती असल्यास धडगाव पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default