चाळीसगाव शहरातील शांतीनगर येथील अशोक किसनचंद छाबडीया (वय- ५८) हे परिवारासह वास्तव्यास असून ते मालेगाव रोडवरील एच. पी. गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसऱ्या दिवशी बॅकेत भरणा करण्याचे काम छाबडीया हे करीत असतात. दरम्यान २५ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास छाबडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत होते. तेवढ्यात दुकानाचे शटर वर करून भावेश मनोज माखोजा रा. उल्हासनगर हा चाकू घेऊन मध्ये शिरला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ३ लाख ६५ हजार रुपयांची रोकड व ७५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच. १९ डीएक्स २९१२) असे एकूण ४ लाख ४० हजार रूपये घेऊन पळ काढला.
40गाव येथे चाकूचा धाक दाखवून गॅस एजन्सीत जबरी चोरी, साडेचार लाख घेऊन पसार
बुधवार, एप्रिल २७, २०२२
0
चाळीसगाव शहरातील एका गॅस एजन्सीत घूसून चाकूचा धाक दाखवत एकजण रोकडसह एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांत एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
