धुळे जिल्ह्यातील पंचायत समिती निर्वाचन गणातील रिक्त पदांच्या पोट निवडणुकांच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जाहीर झाला आहे. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत शिरपूर पंचायत समितीतील हिसाळे गण आणि साक्री पंचायत समितीतील हट्टी खुर्द गणातील सदस्य मयत झाल्याने या जागा रिक्त होत्या. या जागांवर पोटनिवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यात प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना 28 एप्रिल पर्यंत मागवण्यात येणार आहे .तर मतदार यादीसंदर्भात हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक पाच मे असा निश्चित करण्यात आला आहे. निर्वाचक गणांच्या मतदार याद्या अधिप्रमाणित करून अंतिम यादी 11 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी या देखील 11 मे रोजी जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.
