पनवेल येथील कामोठे वसाहतीमधील सेक्टर 17 मधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्रील वर एक अज्ञात इसम चढल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. ग्रीलवर चढून बसलेला व्यक्ती हा अज्ञात होता. तो त्या ठिकाणीच अडकून बसला होता. त्याला खाली येता येत नव्हते व तो येण्याचा प्रयत्न देखिल करत नव्हता. नागरिकांनी अखेर पोलिसांना पाचारण केले. कामोठे पोलीस आणि सिडकोचे अग्निशमन दलाचे जवान या इसमाला खाली उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. पण, हा माथेफिरु खाली येण्यास तयार नव्हता. अग्निशमन दलाचे जवानांनी त्याला दोरीने बांधला व खाली उतरविला. खाली उतरवित असताना देखिल पुन्हा तो वर चढण्याचा प्रयत्न करीत होता.
पनवेल : इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकला माथेफिरु
शनिवार, एप्रिल १६, २०२२
0
पनवेल; प्रतिनिधी : येथील कामोठे वसाहतीमधील सेक्टर १७ मधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्रीलवर अज्ञात माथेफिरु अडकून बसल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) रात्री उशिरा घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करुन या माथेफिरुला खाली उतरवले. या अज्ञात माथेफिरुची ओळख अद्याप पटली नाही.
Tags
