शेततळ्यात बुडून महिलेचा मृत्यू

फुले शाहू आंबेडकर
0
सुळेवाडी शिवारात शेततळ्यात बुडून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
सुमन बाळू पवार (40 रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव हल्ली रा. सुळेवाडी) ही महिला दुपारी घरातून निघून गेली होती. तिचा शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर देण्यात होती. त्यानंतर सुळेवाडी शिवारातील संजय रामदास पवार यांच्या शेततळ्यात या महिलेचा मृतदेह आढळून आल्याची खबर पोलिसपाटील सुरेश जाधव यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार बागूल पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default