पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 04) सकाळी अकराचे सुमारास अंदाजे 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरूणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह ढोरवासा मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात होता. चार दिवसांपर्यंत ना त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटली, ना आरोपींचा सुगावा लागला. जवळपास पाच दिवसांनी आज त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
तसेच, निर्वस्त्र अवस्थेत मृतदेहाजवळ आढळून आलेल्या काही वस्तूंच्या माध्यमातून सदर आणि हत्येच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशीत केले होते. या तरूणीवर सामुहिक अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह भद्रावतीत येथे हा मृतदेह टाकण्यात आला होता. आज या मृतदेहाची ओळख पटली आहे. तर स्थानिक पोलिसांनी या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
दरम्यान, वर्तमानपत्रात प्रकाशीत झालेल्या बातम्यांमधून त्या तरूणीची हत्या झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांना मिळाली. तरूणीचे आई वडिल भद्रावतीत दाखल झाले असून पोलिस प्रशासन त्यांच्याकडून त्या तरूणीची योग्य तऱ्हेने ओळख पटविण्यासाठी खात्री केली आहे. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने आजच तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. मुलीची ओळख पटल्यानंतर तिची हत्या कुणी केली, कशासाठी केली, आरोपींनी मुंडके कोठे टाकले आहे, किती आरोंपीचा घटनेत समावेश आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलिस शोध घेतील. विशेष म्हणजे त्या तरूणीची ओळख पटल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना माहिती देण्याचे टाळून अधिकाऱ्यांपर्यंत पोहचण्यास मज्जाव केल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
