अखेर बहुचर्चेत महामार्गावरील अतिक्रमण काढायला सुरुवात; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित औरंगाबाद-पैठण महामार्गाचं चौपदरीकरणाचा कामाला सुरवात असून, या महामार्गावरील अतिक्रमण काढायला आजपासून ( रविवारी ) सुरवात झाली आहे. या मार्गावरील बिडकीन येथून आज सकाळीच या कारवाईच नारळ फुटलं असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.औरंगाबाद-पैठण महामार्गाचं चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. विशेष म्हणजे आतापर्यंत पाच ते सहा वेळा चौपदरीकरणाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरवात होत नव्हती. आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे डीपीआर आता अखेरच्या टप्प्यात असून, या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमण काढायला सुरुवात झाले आहे.
औरंगाबाद-पैठण या ५० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गावर गेली अनेक दिवसांपासून अतिक्रमण झाले होते. तर यापूर्वी अनेकदा नोटीस सुद्धा देण्यात आल्या होत्या. यावेळी नोटीस मिळाल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, कारवाई होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केला जात होता. पण अखेर आजपासून प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default