सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना जाहीर आव्हान, म्हणाले, “तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा, फक्त आधी अमित ठाकरेंना…”

फुले शाहू आंबेडकर
0
वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत जाहीर आव्हान दिलंय वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत जाहीर आव्हान दिलंय. राज ठाकरे यांच्या मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त आधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा, असं मत व्यक्त करत सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं. ते मुंबईत कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. सुजात आंबेडकर म्हणाले, “सध्या रमजानचे दिवस आहेत. काल कोणीतरी एक वक्तव्य केलं की मशिदीवर मोठे भोंगे लावले तर मी पोरांना तिकडे जाऊन हनुमान चालिसा म्हणायला लावेल. मला यांना एवढीच विनंती करायची आहे की माझा तुमच्या वक्तव्याला १०० टक्के पाठिंबा आहे, फक्त तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणायला लावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default