धक्कादायक! सरकारी रुग्णालयातच कर्मचाऱ्यांची रंगली दारू पार्टी

फुले शाहू आंबेडकर
0
एकीकडे कर्मचाऱ्यांची दारू पार्टी आणि दुसरीकडे शूटिंग सुरू असल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांचे मात्र हाल झाले.
नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) चक्क सिनेमाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आल्याचं समजतंय. त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना काही कर्मचारी चक्क दारू पार्टी करत होते, तर इतर कर्मचारी शूटिंग पाहण्यात व्यस्त होते. या सर्व प्रकाराचे आता फोटो समोर आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय आहे की शुटींग आणि दारूचा अड्डा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयात मध्यरात्री चित्रपटाच्या शूटींगसाठी परवानगी देण्यात आली. याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशनही केलं. एकीकडे कर्मचाऱ्यांची दारू पार्टी आणि दुसरीकडे शूटिंग सुरू असल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांचे मात्र हाल झाले. विशेष बाब म्हणजे मध्यरात्री रुग्णालयात सुरू असलेला हा प्रकार रोखायला कुणीही नव्हतं. ज्या सुरक्षा रक्षकांवर रुग्णालय सुरक्षेची जबाबदारी आहे, ते ही शूटिंग पाहण्यात मग्न असल्यानं कर्मचाऱ्यांची दारू पार्टी बिनबोभाट सुरू होती.
रुग्णालयात सीसीटीव्ही बसवलेले असतानाही कर्मचाऱ्यांनी कुठलीही भीती न बाळगता बेफिकीरपणे दारूचे ग्लास रिचवले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिलं आहे. मात्र असं असलं तरी, भविष्यात रुग्णालयात असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी महापालिका प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय यापूर्वी सुद्धा अनेकदा वादात राहिलं आहे. कधी रुग्णांसोबत वाईट वर्तणूक, तर कधी रुग्णांना वेळेवरप उपचार न मिळणे अशा तक्रारी समोर आल्या आहेत. वर्षभरापूर्वी याच रुग्णालयात गॅस गळतीमुळे २२ जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. झाकीर हुसेन रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. जरी परवनगी घेऊन सिनेमाची शूटींग सुरु असली तरी अटीशर्तींचा भंग झाल्याचंही उघड झालं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default