अवैध गुटख्‍याची वाहतूक; पोलिसांनी केला मुद्देमाल जप्‍त

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकासह स्कार्पिओ कार पोलिसांनी जप्त करीत आठ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. 
दोंडाईचाकडून (Dondaicha) धुळ्याच्या दिशेने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती सोनगिर (Songir) पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) सापळा रचला असताना, माहिती मिळालेली स्कार्पियो कार पोलिसांना रात्रीच्या दरम्यान आढळून आली. पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु कार चालकाने पोलिसांना हुलकावणी देऊन कार वेगात पुढे नेली. त्यानंतर पोलिसांनी या कारचा पाठलाग करून टोलनाक्याजवळ या कारला अडवले व कार चालकाला कारमध्ये काय असल्‍याबाबत विचारणा केली. परंतु, कार चालकाने पोलिसांना (Police) उडवा उडवीचे उत्तर दिले.

सव्‍वा दोन लाखाचा गुटखा

पोलिसांनी कारमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी व पानमसाला गुटखा पोलिसांना आढळून आला आहे. दोन लाख 20 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याचबरोबर स्कार्पिओ कार देखील चालकासह पोलिसांनी जप्त केली असून या कारवाईदरम्यान जवळपास आठ लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default