बीड : डीजे लावून गड्याचा हवेत गोळीबार; हळद पुसण्याआधीच नवरदेवाची 'वरात' जेलमध्ये !

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाचे लग्न रविवारी होते. त्याआधी शनिवारी हळदी समारंभ संपल्यानंतर डीजेच्या तालावर ताल धरत चक्क नवरदेवाने पिस्टलमधून हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोमवारी नवरदेवासह अन्य चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे नवरदेवाला अंगावरील हळद निघाली नसताना व वैवाहिक जीवनाची सुरूवातच जेलच्या हवेने करावी लागणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील हॉटेल व्यावसायिक बालाजी भास्कर चाटे (रा. साकुड ह.मु.अंबाजोगाई) याचा विवाह बीड रोडवरील एका मंगल कार्यालयात रविवारी आयोजित केला होता. शनिवारी हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास नवरेदवाने आपल्या मित्रासोबत डीजेच्या तालावर ठेका धरला. मित्रांसोबत नवरदेवाचा आनंद गगनात मावेनासा झाल्यामुळे मित्राच्या खांद्यावर बसून गाण्याच्या तालावर नाचत नवरदेवाने हवेत गोळ्याच्या फैरी झाडल्या. यावेळी त्याच्याच एका मित्राने या गोळीबाराचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी या प्रकरणी आवाज उठविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default