कराड मंडई परिसरातील फिश मार्केटसमोर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर काही वेळातच सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हातात तलवारी घेऊन काही युवक मंडईच्या दिशेने आले. त्यांच्या पाठीमागे मोठा जमाव होता. त्यातील काही युवकांनी फिश मार्केटमधील एका दुकानात घुसून मसुरकर याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान जखमीला उपचारासाठी त्वरित वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मंडई परिसरात तलवार हल्ला झाल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. तर कॉलेज परिसरातही युवकांनी गर्दी केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मंडई परिसर व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
