बीड : हल्ला करून परराज्यात पसार झालेल्‍या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

फुले शाहू आंबेडकर
0

केज येथे एका तरुणाने तुमच्या मुलीचे लग्‍न माझ्यासोबत का लावून देत नाही, यावरून वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. यामधील तीन आरोपी परराज्यात फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तीनही आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी भागवत संदिपान चाटे (रा. तांबवा ता. केज) व त्याचे इतर दोन साथीदार वशंकर हरिभाऊ इंगळे (रा.वस्ती केज आणि रामेश्वर नारायण लंगे (रा. जहागीर मोहा ता. धारूर) आरोपींची नावे आहेत.

शनिवार (दि. ९) एप्रिल रोजी केज-कळंब रोडनजिक एकनाथ नेहरकर (वय ४२) हा केज ते कळंब रोडने मोटार सायकल वरून येत असताना आरोपींनी संगनमत करून रमेश नेरकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. रमेश नेहरकर यांचेवर अश्विनी हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

या  गुन्ह्यांचे गंभीर्य लक्षात येताच पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेवून तात्काळ अटक केली. ही घटना घडतात आरोपी हे झाशी येथे फरार झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवरून आरोपी केज वरून पुणे, झाशी उत्तर प्रदेश या मार्गे परत पुणे येथे आले. त्‍यानंतर तिन्ही आरोपी यांना वाघोली पुणे येथून अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default