अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने केला एकाचा खून

फुले शाहू आंबेडकर
0

गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे पत्नीचे इतर व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने चाकुने वार करून एकाचा खुन केला. तर आपली पत्नीला देखिल चाकुने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बबन ज्ञानोबा खरसाडे (वय 50) रा.तळणेवाडी असे चाकुने वार करून खुन झालेल्याचे व्यक्‍तिचे नाव आहे. तर रामेश्वर जिट्टे (वय 40) रा. तळणेवाडी असे आरोपीचे नावे आहे. गुरुवार (दि.9) रात्री 9 च्या सुमारास आपली पत्नी सुनिता हिचे गावातील बबन खरसाडे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून खरसाडे याच्या शेतात जावुन जिट्टे यांनी त्‍याचा खुन केला. तर पत्नी सुनिता जिट्टे हिली देखिल घरीच चाकुचे वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्‍काळ धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपाास पोलिस करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default