मातोश्री परिसरातून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. सिग्ननलला त्यांची गाडी थांबली होती. ५ मिनिटांपासून कुणाची तरी गाडी थांबली आहे, असा सेना कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी गाडीची पाहणी केली. त्यात त्यांना मोहित कंबोज दिसले. त्याक्षणी सेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला.
हल्ल्यानंतर मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया
एक लग्नसोहळा आवरुन मी घरी जात होता. कलानगरला एका सिग्नलवर माझी गाडी थांबली होती. त्यावेळी सेना कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. पोलिस आणि माझ्या सुरक्षा रक्षकांनी मला वाचवलं. मी आता कलानगरमधून घराकडे निघालो आहे. पण राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला आहे. त्यांचा कायद्यावर विश्वास नाही का?", असं मोहित कंबोज म्हणाले.
मातोश्रीची रेकी करत होते, या शिवसैनिकांच्या आरोपावर बोलताना मोहित कंबोज म्हणाले, मी जर रेकी करत होतो, तर मुंबई पोलिस काय झोपले होते का? मी कसलीही रेकी करत नव्हतो. मी एका लग्नसमारंभाला गेलो होतो. समारंभ आटपून मी घराकडे निघालेलो असताना शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, असं मोहित कंबोज म्हणाले.