संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले. या बंदला सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप 45 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
काय घडली घटना?
नांदेडमधल प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता शारदानगर येथील त्यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. यात संजय बियाणी आणि त्यांचा कारचालक गंभीर जखमी झाले. शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी दुपारी संजय बियाणी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून गुंडांनी त्यांना अगदी जवळून मारल्याचे त्यात दिसले. नांदेडमधील नागरिकांना स्वस्तात फ्लॅट देणारे म्हणून संजय बियाणी यांची ओळख निर्माण झाली होती. मागील आठवड्यातच त्यांनी 73 कुटुंबांना स्वस्तात घरे उपलब्ध करून दिली होती. तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडपणी वसुलीसाठी त्यांना धमकी दिली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्षा देण्यात आली होती.
दोषींना अटक करा, अन्यथा दिल्लीपर्यंत आंदोलनाचा इशारा
खंडणीखोरांनीच संजय बियाणी यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप संजय बियाणी यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणी दोषींना तत्काळ अटक करा, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांच्या पत्नीने तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दिला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले. या बंदला सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. बियाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अद्याप 45 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
