आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित दोन अधिकारी निलंबित; NCB ची कारवाई
गुरुवार, एप्रिल १४, २०२२
0
नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने हलगर्जीपणाचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. हे दोन्ही अधिकारी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणातल्या कारवाईमध्ये सहभागी होते.
एनडीटीव्हीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मुंबईतल्या कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने छापा टाकत ३ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला अटक केली होती. तो आणि त्याच्यासह इतर १९ जणांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अमली पदार्थ बाळगणं, त्यांचं सेवन करणं, त्यांची खरेदी विक्री करणं यासाठी कारवाई करण्यात आली होती.

