सदावर्तेंना नागपुरातून फोन केलेला 'तो' ST कर्मचारी अखेर पोलिसांच्या ताब्यात

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूर: एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन करुन हल्ला केला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १०९ एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यात एसटी आंदोलनाची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणवंत सदावर्ते यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनाच्या दिवशी सदावर्ते (Gunaratna sadavarte) हे नागपूर येथील एका व्यक्तीशी संपर्कात होते. याबाबत आता मुंबई पोलिसांनी (Police) नागपुरातील एका एसटी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. संदीप गोडबोले अस या एसटी (ST) कर्मचाऱ्याचे नाव आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी कर्मचारी गोडबोले हे सदावर्ते यांच्या संपर्कात होते. संदीप गोडबोले नागपुरात यांत्रिक पदावर कार्यरत आहेत. नागपुरातील संपर्कातील असलेल्या व्यक्तींपैकी गोडबोले एक असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली. गोडबोले यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. या प्रकरणातील त्यांची पोलीस कोठडी आजपर्यंत सुनावण्यात आली होती ती संपल्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले होते या सुनावणी दरम्यान सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. सदावर्तेंच्या मागील सुनावणीला देखील सातारा पोलीस (Satara Police) गिरगाव सत्र न्यायालयात ताबा मागण्यासाठी आले होते. अखेर आता न्यायालयाने सदावर्तें यांचा सातारा पोलिसांकडे दिला आहे. त्यानुसार आता १७ तारखेपर्यंत सदावर्तेंंचा ताबा सातारा पोलिसांकडे उद्या दिला जाणार आहे. तर सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. का मागितला सातारा पोलिसांनी ताबा - वकील गुणरत्न सदाववर्ते यांच्या विरोधात फलटण येथे सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती अशी प्राथमिक माहिती कळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default