मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर परिसरात ही घटना घडली आहे. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री यांचे मृतदेह आपल्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.
दोघांचेही मृतदेह इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवलेले आढळून आले. त्यामुळे दोघांचीही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, पोलिसांनी दोनही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. कलंत्री यांची हत्या त्यांच्या मुलानेच केली असावी असाही संशय पोलिसांना आहे.
