ब्रम्हदेव हनुमान कदम (वय 26) रा. मंझेरी ता.बीड असे मयताचे नाव आहे. तर लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर पांडुरंग बहिरवाळ रा.मंझेरी ता.बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत ब्रम्हदेव कदम हा अविवाहित असून शेती करायचा. आरोपी मित्र लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वरची बहीण नांदत नसून एकमेकांच्या घरी येणे-जाणे असल्याने तिचे व ब्रम्हदेवचे सूत जुळले होते. त्यांच्यातील प्रेमप्रकरणाची भणक लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वरला लागली होती.
या दरम्यान रात्री पाली नजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण करून मयत ब्रह्मदेव कदम आणि आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर बहिरवाळ हे दोघे मंजिरी गावाकडे जात होते. यावेळी शांतीवन नजीक आल्यानंतर आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर याने धावत्या दुचाकीवर ब्रह्मदेव याच्या पोटात चाकूने सपासप वार कडून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर हा मयत ब्रह्मदेव अशी गाडी घेऊन फरार झाला होता. मात्र बीड ग्रामीण पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
