चिठ्ठीत भावनिक मजकूर
रुपाली पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्या घरच्यांचा काही दोष नाही. माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही. घरातील देव्हाऱ्याजवळ एक पर्स असून त्यामध्ये मी शिलाई काम करून जमवलेली रक्कम असून ती माझ्या मुलांची आहे असा मजकूर आहे. आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते. मात्र मी हरले असून मुलगा व मुलीस सांभाळून घ्या असा भावनिक मजकूर आहे. याबाबत श्रीराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस
निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली जुबेर खाटिक, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, राजेश पाटील तपास करीत आहेत. दरम्यान विवाहितेची बदनामी करणारा अज्ञात व्यक्ती कोण? विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाउल का उचलले याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून अज्ञात व्यक्तीस पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
