नाशिक : युवकाकडील रोकड हिसकावून घेत मारहाण

फुले शाहू आंबेडकर
0

नाशिक : युवकाकडील रोकड हिसकावून त्यास मारहाण करीत दुखापत केल्याची घटना भारतनगर परिसरात घडली. या प्रकरणी हाशीम गफुर अन्सारी (३०, रा. बिहार) यांनी अरबाज बागवान (रा. भारतनगर) व इतर दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. 

अन्सारी यांच्या फिर्यादीनुसार ते बुधवारी (दि. ४) मध्यरात्री १२.३० च्या सुमारास मुंबईहून भारतनगर दर्ग्याजवळ आले. तेथे वाहनातून उतरल्यानंतर ते कारचालकास पैसे देत होते. त्यावेळी तिघे संशयित तेथे आले व त्यांनी अन्सारीकडील साडेतीन हजार रुपयांची रोकड हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. अन्सारी यांचा भाचा मासुम अन्सारी याने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यालाही मारहाण केली. तिघांच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी हाशीम अन्सारी यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता संशयित अरबाज बागवान याने लोखंडी हत्याराने हाशीम यांच्या खांद्यावर, छातीवर व चेहऱ्यावर हल्ला करून दुखापत केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default