म्हसदी येथील शंकर बंडू गायकवाड (वय३६), नांदरखी येथील विजय बंडू सोनवणे (वय२८) व म्हसदी येथील
गोकुळ दिलीप माळी (वय २६) आणि अक्रम रविंद्र सोनवणे (वय २३) असे चौघे एम. एच. १८ बी. यु. ३९५८ व एम. एच. १८ यु ८५३१ या दोन मोटारसायकलने शेणपुर फाट्याजवळून जात
असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. रात्री १० च्या सुमारास झालेल्या या अपघातात शंकर गायकवाड गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर विजय सोनवणे, गोकुळ माळी, अक्रम सोनवणे हे तिघे जखमी झाले.
धुळे : वाहनाची दुचाकींना धडक ; एक ठार, तिघे गंभीर
शुक्रवार, मे ०६, २०२२
0
धुळे (पिंपळनेर):पिंपळनेर ते साक्री रस्त्यावरील (म्हसदी प्र. सामोडे शिवारात) शेणपूर फाट्यावर अज्ञात वाहनाने दोन मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील एकजणाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर
वाहन चालकाने तेथून पळ काढला असून पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिल्याने अपघाताची नोंद झाली.
Tags
