पती विनाकारण मारहाण करायचा. या कारणामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. यानंतर पत्नी घरी पुन्हा परत यावी, यासाठी पती तिला घ्यायला तिच्या माहेरी गेला होता. मात्र, यावेळी एक अनपेक्षित घटना घडली
नेमकं काय घडलं -
पती विनाकारण मारहाण करायचा. या कारणामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. यानंतर पत्नी घरी पुन्हा परत यावी, यासाठी पती तिला घ्यायला तिच्या माहेरी गेला होता. मात्र, यावेळी एक अनपेक्षित घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या या पतीने आपल्या सासूसाच खून केला. त्याने आपल्या पत्नीवर आणि सासूवर विळ्याने हल्ला केला. यात सासूबाई कमळाबाई सोमा भुतांबरे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पतीने केलेल्या या हल्लात पत्नी इंदुबाई किसन पारधी आणि त्यांची 12 वर्षाची मुलगी माधुरी ही जखमी झाली आहे.
इंदुबाईच्या पतीला दारुचे व्यसन होते. याचमुळे कंटाळून ती आपल्या मुलीला माधुरीला घेऊन माहेरी आली होती. तिचे माहेर झारवड हे आहे. मात्र, रविवारी तिचा पती किसन तेथे आला. यावेळी त्याने आपली पत्नी इंदुबाईला घरी येण्याबाबत आग्रह केला. मात्र, ती नकार देत होते. याचमुळे यावरुन पुन्हा पती-पत्नीत भांडण सुरू झाले. रागाच्या भरात आरोपी किसनने पत्नीला मारहाण केली. यावेळी हे भांडण मिटवण्याचा सासू कमळाबाई आणि मुलगी माधुरीनेही प्रयत्न केला. मात्र, किसनने कमळाबाई यांच्या पोटात आणि पाठीवर कात्रीने तसेच विळ्याने वार केले. यात सासू कमळाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
