प्रेमात नवरा ठरला अडथळा, प्रियकराच्या मदतीने पतीच्या छातीत खुपसला चाकू, मुंबईतील घटना

फुले शाहू आंबेडकर
0

दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता.

मुंबई, 23 मे : पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतील  गोवंडीत घडली आहे. प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची  एका पत्नीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मुंबईतील गोवंडी परिसरातील बैगनवाडी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी महिलेनं नाव नजीरा (वय 32) असून तिच्या प्रियकराचे नाव सदर आलम आहे. या दोघांनी मिळून नजीराचा पती इरफान खान (वय 34) याचा खून केला आहे.

गोवंडीतील बैगनवाडी परिसरात नजिरा ही इरफान खान याच्यासोबत राहत होती. गुणगोविंदाने दोघांचा संसार सुरू होता. अलीकडच्या काळात आरोपी नजिरा बानो आणि आलम याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पण दोघांच्या प्रेमात तिचा पती अडथळा येत होते. दोघांच्या प्रेम प्रकरणाची इरफानला माहिती मिळाली. त्यामुळे इरफान आणि नजिरामध्ये कायम वाद होता. शनिवारी पहाटे तिघांमध्ये असाच वाद झाला. यावेळी नजिराने इरफानच्या छातीत चाकू खुपसला. चाकूचा वार वर्मी लागल्यामुळे तो जागेवरच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. शिवाजी नगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शिवाजी नगर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास या प्रकरणात पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default