आता धुळ्यात पाच दिवसांआड पाणी; महापौरांचे स्‍पटीकरण

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : धुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नागरीकांसह विरोधकांनी प्रशासनावर ताशेरे ओढत सत्‍ताधारी भाजपवर निशाणा साधला होता. परंतु, शहराला पाणी पुरवठा होत असलेली पाईप लाईन जुनी असून त्‍यात लिकेज असल्‍याने पाणी पुरवठा उशिराने होत असल्‍याचे (Dhule News) स्‍पष्‍टीकरण महापौर प्रदीप करपे यांनी केले आहे
सध्या धुळ्यामध्ये पाणीप्रश्न चांगलाच तापला आहे. धुळे (Dhule) शहराला तापी नदीमधून (Tapi River) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु तापी नदीपासून धुळे शहरापर्यंत आलेली पाईपलाईन ही जवळपास ३२ वर्ष जुनी असल्यामुळे या पाईप लाईनमध्ये बऱ्याच ठिकाणी लिकेज होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पालिका प्रशासनातर्फे या पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळेच धुळेकरांना पाण्यासंदर्भात अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारपासून पाच दिवसाआड पाणी

परंतु येत्या 15 तारखेपासून धुळेकरांना पाच दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे देखील महापौरांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी सध्या पाण्याच्या मुद्द्यावरून वरून जे प्रश्न उपस्थित केले आहे. त्यापेक्षा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यावर पाठपुरावा करावा जेणेकरून पाणीपुरवठा आणखीनच सुरळीत करता येईल; असा सल्ला देखील महापौर प्रदीप कर्पे यांनी विरोधकांना दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default