महाराष्ट्र– मध्यप्रदेश सिमावर्ती भागात अवैध दारूची वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. पोलिसांकडून अनेकदा कारवाई होवून देखील ही दारूची चोरटी वाहतुक अजूनही सुरू आहे. त्यानुसार अवैध वाहतुक होत असलेल्या दारूचा साठा पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई शिरपूरमध्ये पोलिसांनी केली आहे.
कारमध्ये चाळीस बॉक्स
पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना वाघाडीहुन बाळदे मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून एक संशयीत कार आढळली. त्याची तपासणी करत असताना पोलिसांना कारमध्ये जवळपास देशी- विदेशी दारूचे 40 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी कारसह संपूर्ण दारूसाठा व कार चालकाला ताब्यात घेतले आहे.
