साक्री : साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील गत तीस वर्षापासून अनेक वाड्या, वस्त्या, पाड्यांचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे नवीन ग्रामपंचायत विभाजनासाठी ग्रामस्थांमधून वेळोवेळी मागणी करण्यात येत होती. गावाचा स्वतंत्र विकास करण्यासाठी या ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली. काही ग्रुप ग्रामपंचायतींचा विस्तार खुपच मोठा होता. हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळत होती. आता नवीन चौदा ग्राम पंचायतींची निर्मिती झाली आहे
साक्री तालुक्यातील आदिवासी उपयोजना कार्यक्षेत्रातील पश्चिम पट्ट्यातील मुळ ग्रुप ग्रामपंचायत पानखेडा (मधून मल्याचापाडा) वाकी ग्रा. पं. मधून (बोढरीपाडा, चिंचपाडा) तसेच देगांव ग्रा. पं. मधून (गव्हाणीपाडा) सुकापूर मधून (होळ्याचापाडा, हारपाडा, महाळ्याचापाडा नवीन ग्रा. पं. अस्तित्वात आल्या आहेत) कुडाशी मुळ ग्रा. पं. मधून (पोहबारा, महुबंद, नवीन ग्रा. पं. निर्माण झाली आहे.) टेंभे प्र. वार्सा मधून (नवीन पुनाजीनगर, जयरामनगर, शिवाजीनगर या नवीन ग्रा. पं. निर्माण झाल्यात). काकरदे मुळ ग्रा. पं. मधून (नविन ग्रा. पं. राईनपाडा, हनुमंतपाडा) या ग्रा. पं. अस्तित्वात आल्या आहेत. एकूण सात मुळ ग्रा. पं. मधून नवीन १४ ग्राम पंचायती अस्तित्वात आल्याचे ग्रामविकास विभागाने आदेशित केले आहे.
स्वतंत्र कार्यालय
आता या चौदा पंचायतीचे त्यांच्या महसूल गावात स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत, शाळांच्या इमारती, अंगणवाडी, वीज, लोकसंख्या नुसार त्या-त्या पंचायतीत पेसाचा निधी, रेशन दुकान, रस्ते, पाणी, ग्रामपंचायतीचा कारभार अधिक सुरळीतपणे चालावा, प्रत्येक ग्रामस्थाला मूलभूत सुविधा उपलब्ध होऊन एकूण गाव-खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. संबंधित ग्रा. पं. चे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी सहकार्य केले. ग्रा. पं. विभाजनासाठी माजी खासदार बापू चौरे, आमदार मंजुळ गावित, जि.प. सदस्य विश्वास बागूल, रमेश बागूल व मंत्रालय स्तरावर सुकापुर येथील रहिवासी गुलाब चौधरी यांनी पाठपुरावा करून सहकार्य केले. संबंधित ग्रामपंचायत विभाजनासाठी शशिकांत राऊत, कमलाकर साबळे, पंडित चौरे, गणपत चौरे राजू पवार, बन्सीलाल बहिरम, काळू बहिरम, जालमसिंग देसाई, गोकूळ गवळी, छगन चौरे, प्रवीण चौरे, निंबा भोये यांनी नवीन ग्रा. पं. विभाजनासाठी परिश्रम, पाठपुरावा केला.