घृणास्पद; महिलेला शीतपेय पाजून अनैसर्गिक अत्याचार, व्हिडिओ केला व्हायरल

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव: एका ३० वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्स पाजून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाहीतर अत्याचार करतांनाचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याप्रकरणी वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी तीस वर्षीय महिलेला सुमारे एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी कोल्ड्रिंक्स पाजून जामनेर ते भुसावळ दरम्यानच्या एका गावाजवळ असलेल्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला होता.
एवढेच नव्हे तर अनैसर्गिक अत्याचार करताना मनीषाने व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबत पीडित महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून
संशयित गोविंद जगन तवर श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक यांच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default