वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टरसह चार लाखाचा मुद्देमाल जप्‍त

फुले शाहू आंबेडकर
0
चाळीसगाव (जळगाव) : अवैध वाळूची वाहतूक सुरूच आहे. अशी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला चाळीसगाव शहर पोलिसांनी (Police) आज पकडले असून चालकाला अटक करत ट्रॅक्टर ताब्‍यात घेतले आहे.
चाळीसगाव (Chaligaon) तालुक्यातील डेराबर्डीकडून शहराकडे येत असलेल्‍या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर पोलिसांना संशय आला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टरला थांबवून चौकशी केली असता ट्रॉलीत ७ हजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास गौन खनिज (वाळू) मिळून आला. निखिल सुनील कुढे (वय २३) असे अटक केलेल्‍या चालकाचे नाव आहे.

चार लाखाचा मुद्देमाल जप्‍त

शहर पोलिसांनी चालकाला (Jalgaon News) ताब्यात घेऊन ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची ट्रॉली व ७ हजार रूपये किंमतीची वाळू असे एकूण ४ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१२ मे) सकाळी ७ वाजताच्या सुमारास केली. या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default