हिसाळे परिसरात असलेल्या गोरक्षनाथ पाडा येथील व्यक्ती अग्निशस्त्र अवैधरीत्या जवळ बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ (Police) अधिकारी हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.
संबंधीत व्यक्ती फरार
पोलिस येत असल्याची माहिती समजल्यामुळे संबंधित अग्निशस्त्र बाळगणारा व्यक्ती पसार झाला आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी घराची तपासणी केली असता त्यामध्ये एक अग्निशस्त्र तसेच तीन जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आले आहेत. यासंदर्भात फरार झालेल्या संशयिताचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे तपास सुरू आहे.
