फुकटात सिगारेट दिले नाही; टपरी चालकाच्या डोक्यात फोडल्या बियरच्या बाटल्या
रविवार, मे २२, २०२२
0
उल्हासनगर : फुकटात सिगारेट न दिल्याने एका टपरी चालकाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील संभाजी चौकात मनीष पान शॉप नावाची पानटपरी आहे. या टपरी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Tags
