कामावरुन कमी केल्याच्या नैराश्यातून तरुणीने घेतला मित्राच्या घरी गळफास

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक : ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या बायजुस इज्युटेक कंपनीने कामावरुन कमी केल्याने तरुणीने मित्राच्या घरी जावून गळफास घेत आत्महत्या केल्याची नाशिक मधील धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गंगापूर रोड वरील इंद्रप्रस्थ हॉलच्या पाठिमागे घडली. पोलिसांनी  घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियांका खैरनार (२४, रा. ओम शुभम अपा. इंद्रप्रस्थ हॉलजवळ, गंगापूर रोड, नाशिक) असे मृत मुलीचे नाव आहे. बायजुस ऑनलाईन एज्युटेक कंपनीने प्रियांकाला कामावरुन कमी केले होते. दीड महिन्यांपासून काम नसल्याने ती नैराश्यात होती. पुणे येथील बायजुस कंपनीत ती अस्थायी पद्धतीने नोकरीला होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात नोकरीचा उल्लेख केला आहे.
प्रियंकाने गंगापूर नाका येथील मित्राच्या घरी आल्यावर गळफास घेत आत्महत्या केली. दिड महिन्यांपासून ती मित्राच्या घरी राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default