या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात बोरणारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. शिवसेना आमदार रमेश बोरणारे सतत धमकावत असून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत असल्याचा आरोप भावजयीने आपल्या पत्रामध्ये केला आहे. यामुळे मला आणि माझ्या परिवाराला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी असे पत्र आमदार रमेश बोरणारे यांच्या भावजयीने वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना दिले आहे.
शिवसेना आमदाराच्या त्रासाला कंटाळून भावजयीची गृहमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी
रविवार, मे २९, २०२२
0
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या भावजयीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन लिहून आत्महत्येची परवानगी मागितलीय. जयश्री दिलीपराव बोरणारे असे या भावजयीचे नाव आहे. यापूर्वी भावजयीने आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता.
Tags
