दुकानातील कामगारांनीच केला विश्‍वासघात; ७२ लाखांचे दागिने लुटले

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : सात ते आठ वर्षांपासून विश्वासू म्हणून सराफ दुकानात कामाला असलेल्या कामगारांनीच विश्वासघात करत दुकान मालकाला 72 लाखांच्या सोने व चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजस्थान येथील दोन्ही संशयितांविरुध्द आझादनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
महिन्याच्या अखेरीस दुकानातील (Dhule News) सर्व सोने व चांदीचा स्टॉकची मोजणी करण्यात येते. या दरम्यान दुकानात उपलब्ध असलेल्या सोन्या-चांदीच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घट आल्याचे दुकान मालकास समजले. त्यावरून दुकानामध्ये सोन्या चांदीचे वस्तू चोरीला गेल्या असल्याची खात्री दुकान मालकाची झाली. त्यानंतर ज्या दोघा विश्वासू कामगारांवर या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबाबदारी सोपवली होती; त्यांनीच ही चोरी केली असल्याचे उघडकीस आले.

एकाने केली आत्‍महत्‍या

या दोघांपैकी एका चोरट्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तर दुसरा चोरटा राजस्थान येथील असून सध्या तो फरार असून आझादनगर पोलिस आता या संदर्भातील पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default